🕒 1 min read
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून मास्कमुक्ती केली जाणार का? याबाबत चर्चा रंगली होती. कारण कोरोना रुग्णसंख्याही घटत आहे, त्यातच निर्बंधातही बऱ्याच प्रमाणात शिथिलता करण्यात आली आहे. त्यामुळे आता मास्कमुक्ती बाबतही निर्णय घेतला जाणार का, असे म्हटले जात होते. यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
“करोना अजून संपलेला नाही. मास्क कधी काढणार, मास्कमुक्ती कधी होणार, हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. पण मास्कमुक्ती नेमकी कधी होणार, याबद्दल आताच पूर्ण खात्रीने काहीही सांगता येणार नाही. आता आपल्याला हा जो काळ भेटला आहे, तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच आता कोरोनाची लाट कमी होत असतांना लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. लसीकरणानंतरही करोनाची लागण होते. पण त्याची घातकता नक्कीच कमी होते. त्यामुळे प्राण वाचवण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून लस महत्वाची आहे”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
ते अलिबाग येथील उसरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
- “राज्यात २०२५ पर्यंत २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक”, सुभाष देसाई यांची घोषणा
- ‘दिशा सालियान मृत्यूवरुन राजकारण महाराष्ट्राला न शोभणारं’ – किशोरी पेडणेकर
- विराट कोहलीने चाहत्यांना दिले चॅलेंज, फोटोत दाखवले त्याचे १० वेगवेगळे चेहरे, विचारले – खरे कोण?
- भीमा कोरेगाव आयोगासमोर पवार उपस्थित राहणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब
- ‘चिन्ना थाला’ला चेन्नई सुपर किंग्सने केले अलविदा!


