मुंबई: उद्योगमंत्री सुभाष देसाई (subhash desai)यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात २०२५ पर्यंत २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, या माध्यमातून राज्यातील लाखो लोकांना रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते महा इन्फ्रा कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.
ते म्हणाले की, “नवी मुंबईत जेम्स ज्वेलरी पार्क उभे करण्यात येत आहे. जागतिक दर्जाचं हे जेम्स ज्वेलरी पार्क असेल. त्यामुळे दीड लाख कर्मचाऱ्यांना काम मिळणार आहे. सोबतच यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. सोबतच नवी मुंबईत टाटा संकूल उभारण्यात येणार असून, देशासह राज्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. या संकूलाच्या माध्यमातून विक्रमी १.७५ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.”
https://bit.ly/3LO8AOz
तसेच शासनाचा तळेगाव आणि औरंगाबादमध्ये ईलेक्ट्रॉनिक्स पार्क उभारण्याचा विचार असून या माध्यमातून सरकारचा इलेट्रॉनिक उत्पादनामध्ये स्वावलंबी होण्याचा प्रयत्न आहे. या ईलेक्ट्रॉनिक पार्क माध्यामातून रोजगार सोबतच स्वस्तात इलेट्रिक वाहने देखील मिळणार असल्याचे सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “ तो भारताचा ३६० डिग्री स्टार खेळाडू आहे”; कायरान पोलार्डने केली भारतीय खेळाडूची प्रशंसा
- ‘आमच्या जिवाचं बरं वाईट झाल्यास नेते जबाबदार’; दिशा सालियानच्या पालकांच्या भावना
- ‘आमच्या जिवाचं बरं वाईट झाल्यास नेते जबाबदार’; दिशा सालियानच्या पालकांच्या भावना
- मॅग्नस कार्लसनला पराभूत केल्यानंतर ग्रँडमास्टर प्रग्नांधानची दुहेरी विजयी कामगिरी
- विराट कोहलीने चाहत्यांना दिले चॅलेंज, फोटोत दाखवले त्याचे १० वेगवेगळे चेहरे, विचारले – खरे कोण?


