🕒 1 min read
मुंबई: दिशा सालियान (Disha Saliya) हीच्या मृत्यूवरुन राजकारण सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी तिच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना दिशाचं एक बिझनेस डील फेल गेल्यानंतर नैराश्यातून तिनं आत्महत्या केल्याचं सांगितलं. तसचं या प्रकरणावरुन घाणेरडं राजकारण होऊ नये अशी अपेक्षाही व्यक्त केली.
तसेच यावेळी दिशा सालियानच्या पालकांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुलीच्या आत्महत्येनंतर सुरू असलेले राजकारण वाईट असून आम्हालाही जगू द्या, असे भावूक आवाहन दिशा सालियन हिच्या पालकांनी केले आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर या मुद्यावर पुन्हा राजकारण सुरू झाले होते. सध्या सुरू असलेल्या आरोपांमुळे आम्ही व्यथित झाले असून आमच्या जीवाचे बरं वाईट झाल्यास नेत्यांना जबाबदार ठरवण्यात यावे असेही दिशा सालियनच्या आई-वडिलांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
विराट कोहलीने चाहत्यांना दिले चॅलेंज, फोटोत दाखवले त्याचे १० वेगवेगळे चेहरे, विचारले – खरे कोण?
भीमा कोरेगाव आयोगासमोर पवार उपस्थित राहणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब
“ तो भारताचा ३६० डिग्री स्टार खेळाडू आहे”; कायरान पोलार्डने केली भारतीय खेळाडूची प्रशंसा
‘आमच्या जिवाचं बरं वाईट झाल्यास नेते जबाबदार’; दिशा सालियानच्या पालकांच्या भावना


