मुंबई – देशांतर्गत वाहतूक सुरु झाल्यानंतर त्याचबरोबर कोरोनाची दुसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कडक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि मुंबईत दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरात या राज्यांमधून विमान, रेल्वे आणि रस्ते मार्गाने प्रवेश करणाऱ्या नागरिकांची RT-PCR चाचणी (२५ नोव्हेंबर) आजपासून अनिवार्य करण्यात आली आहे.
राज्यात काल 5439 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4086 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1658879 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 83221 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.69% झाले आहे.
दरम्यान, कोरोना पुन्हा एकदा थैमान घालणार का ? पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. दिल्ली, राजस्थान आदी अन्य राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मात्र, आपल्याकडे अजून तरी तशी स्थिती नाही. यामुळे तूर्तास लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला गेला नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात टोपे यांनी ही माहिती दिली.
कोरोनाची लस कधी येणार याबाबत अद्याप कालावधी निश्चित नाही. ती कधी येईल हेही माहित नाही. त्यामुळे नागरिकांनी आपली स्वतःची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही टोपे यांनी सांगितले. तसेच भविष्यातील परिस्थिती पाहून नियमावली तयार केली जाईल, असा मोदींचा मानस आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणची गर्दी आटोक्यात येण्यासाठी योग्यत ती नियमावली तयार करण्यात येईल, असेही टोपे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन
- अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी, निष्ठावंत व समर्पित नेतृत्व गमावले- बाळासाहेब थोरात
- ‘दानवे खासदार असल्याचं माहित आहे पण त्यांना ज्योतिषशास्त्र देखील कळतं याची कल्पना नव्हती’
- प्रताप सरनाईक यांच्यावर जो इडीचा छापा पडला त्यात भाजपचा कोणताही हात नाही : पाटील
- लस कधी येणार हे सांगू शकत नाही, पण ती सर्वांना उपलब्ध करून देणार – नरेंद्र मोदी


