Share

‘दानवे खासदार असल्याचं माहित आहे पण त्यांना ज्योतिषशास्त्र देखील कळतं याची कल्पना नव्हती’

Published On: 

मुंबई : या सरकारला वर्षपूर्ती होत असतानाच हे सरकार लवकरच पडेल अशी टीका भाजप नेत्यांनी पुन्हा सुरु केल्याचं दिसून येत आहे. ‘येत्या दोन ते तीन महिन्यात ठाकरे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल. ते कसं येणार आहे, ते पत्रकारांना लवकरच कळवतो’ असं विधान रावसाहेब दानवे यांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

कधी एकमेकांचे तोंडही न पाहणारे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहेत. पण येत्या दोन ते तीन महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि आपले सरकार येईल, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करून दिला.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी असा दावा केल्यानंतर त्यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत रावसाहेब दानवेंची खिल्ली उडवली आहे. रावसाहेब दानवे खासदार असल्याचं माहित आहे. पण त्यांना ज्योतिषशास्त्रदेखील कळतं याची कल्पना नव्हती. त्यांना ज्योतिषशास्त्र समजतं, हे मला आत्ताच कळतंय , अशी खिल्ली शरद पवार यांनी उडवली आहे.

दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील दानवेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडेल असे दिवास्वप्न भाजपाचे नेते पाहत आहेत. त्यांनी ही स्वप्ने पहात रहावीत, असा टोला थोरात यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला.

तसेच मी पुन्हा येणार असे म्हणणाऱ्यांचे काय झाले, हे आपण पहातच आहोत. महाराष्ट्रात भाजपाचे कोणतेही ऑपरेशन यशस्वी होणार नाही. महाविकास आघाडी सरकारने एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला असून पुढील चार वर्षाचा कार्यकाळ ही पूर्ण करू असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!