Share

प्रताप सरनाईक यांच्यावर जो इडीचा छापा पडला त्यात भाजपचा कोणताही हात नाही : पाटील

Published On: 

ठाणे : मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांना ठाण्यातून ताब्यात घेतले असून, त्यांना सोबत घेऊन गेले आहेत अस वृत्त विविध माध्यमातून समोर येत आहे.

त्यांना कार्यालयात नेऊन चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर, सरनाईक यांच्या कुटुंबीयांचे ठाण्यातच एक घर आहे. तेथे विहंग यांना ईडीचे पथक घेऊन गेल्याचे कळते. . ईडीने दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांजवळ सर्च ऑपरेशन सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे.

प्रताप सरनाईक यांच्या घरासोबत त्यांच्या कार्यालयामध्ये देखील ईडीने धाड टाकली. यामध्ये ईडीकडून मुंबई तसंच ठाणे परिसरातील 10 ठिकाणी शोधमोहीम सुरु केली.ईडीच्या पथकाकडून सकाळी 8 वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान सध्या प्रताप सरनाईक देशाबाहेर गेले आहेत.प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरी देखील ईडीचे पथक दाखल झाले होते. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले आहे.

सत्ताधारी पक्षांकडून भाजपवर विविध आरोप केले जात आहेत. खासदार शरद पवार यांनी भाजपवर टीका करताना सत्ता गेल्यामुळे काहींना त्रास होतोय त्यामुळेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरावर ईडीचे छापे पडले असं म्हटलं आहे. सत्तेचा गैरवापर करणं ही त्यांच्या कामाची पद्धत. नैराश्य माणसाला स्वस्थ बसू देत नाही. सत्ता मिळत नसल्यानं ते अस्वस्थ आहेत असंही ते म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केले आहे. ‘ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे, त्यांच्याकडून होणाऱ्या कारवाईमध्ये केंद्राचा कोणताही हात नसतो. त्यामुळे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर जो इडीचा छापा पडला त्यात भाजपचा कोणताही हात नसल्याचा खुलासाही पाटील यांनी केला. इडीच्या कारवाईबाबत आरोप करणे म्हणजे विरोधकांना संविधान अमान्य असल्याचा,’ आरोपही त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!