नवी दिल्ली : गेले ८ महिने कोरोनाने देशात हाहाकार माजवला आहे. मधल्या काळात नव्या कोरोनाबाधितांचा रोजचा एकदा लाखांच्या जवळ पोहोचला होता. मात्र, यानंतर हा एकदा आटोक्यात येऊन ५० हजारांच्या खाली गेल्याचं दिसून आलं. हे दिलासादायक असलं तरी तज्ज्ञांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार दुसरी लाट येऊ शकते.
दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यामुळेच वेळीच संकट ओळखून नियोजन करण्याबाबत व लस उपलब्ध झाल्यास त्याच्या वितरणाबाबतचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतल्यानंतर मोदींनी जनतेशी संवाद साधला आहे.
“काही लोक कोरोना लसीवरून राजकारण करत आहेत. पण लस कधी येणार हे आपल्या हातात नाही. ते आपण ठरवू शकत नाही. फक्त लस आल्यानंतर कोणाला प्राधान्याने ती दिली पाहिजे याबाबत स्पष्टता आहे. सर्वांपर्यंत लस पोहोचवली जाईल याची तयारी करा”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत स्पष्ट केलं. “लसीकरणाची प्रक्रिया अडथळे न येता आणि पारदर्शी पद्धतीने राबवली पाहिजे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने आतापासून तयारी करणं आवश्यक आहे. आपल्या आरोग्य सेवकांना आणि आघाडीच्या फळीतल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोरोना लस मिळेल याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे”, असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोविड रुग्णांचा आकडा पुन्हा वाढायला लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी गुजरात, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि राजस्थान राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हर्च्युअल मीटिंग घेतली. त्यामध्ये गृहमंत्री अमित शहा देखील सामील झाले होते.
महत्वाच्या बातम्या
- भाजपने आणखी एक घर फोडलं, कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्याच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश
- अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ गाण्यावर नेटकरी नाराजच, डिसलाइक्सचा नवा विक्रम होण्याची शक्यता
- ‘केंद्राची महाराष्ट्राला सापत्न वागणूक मदत देणे तर दूरच, नुकसानीची पाहणी करण्यासाठी पथकही पाठवले नाही’
- मी कोणासोबत आहे हेच कळेना; ‘या’ शिवसेना खासदाराच्या वक्तव्याने चर्चांना उधाण!
- अंगावर आलं की बोंबलायचं ही शिवसेनेच्या नेत्यांची सवयंच – गोपीचंद पडळकर


