मुंबई : अगदी कमी वयातच बॉलिवूडमध्ये आपल्या करियरची सुरुवात करणारी अभिनेत्री प्राची देसाई सध्या नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. बॉलीवूडमध्ये कमी वयातच तिने आपले भक्कम स्थान निर्माण केले. प्राची देसाई ही अशी अभिनेत्री जी बॉलिवूडमधील कोणत्याही विवादामध्ये सापडलेली नाही.
प्राचीने सध्या बॉलीवूडमधून ब्रेक घेतला आहे. बऱ्याच दवसांपासून तिने कोणत्याही प्रोजेक्टवर काम केले नाही. दरम्यान, प्राची देसाईने नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्यावर आणि करिअर बद्दल भाष्य केलं आहे.
एका प्रसिद्ध वहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्राची म्हणाली, ‘शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेचच मला मालिकेत मुख्य भूमिका मिळाली. मालिकांनंतर मला चित्रपटांमध्येही काम मिळालं. मला फार कमी वेळेतच बॉलीवूडमध्ये पटापट संधी मिळली. पण तेव्हासुद्धा मी माझ्या तत्वांशी एकनिष्ठ होते आणि आतासुद्धा आहे. प्रसिद्धीसाठी अनेकांना या क्षेत्रात तडजोड तडजोड करावी लागते. मी चित्रपटांपासून दुरावले, यामागची अनेक कारणं आहेत. मला पुरुषांना श्रेष्ठ दाखवून स्त्रियांना कमी लेखणाऱ्या चित्रपटांमध्ये कधीच काम करायचं नव्हतं यामुळे मी बॉलीवूडमध्ये बराच संघर्ष केला. प्रत्येकाला फक्त ‘हॉट’ अभिनेत्रीच हवी असते. त्यामुळे तशा गोष्टींपासून दूर राहणं पसंत केलं. यासाठी मी काही मोठ्या चित्रपटांनाही नकार दिला’
महत्वाच्या बातम्या
- ‘..म्हणून झक मारत मुख्यमंत्री ठाकरेंना कोकणात यावे लागले’, निलेश राणेंची जहरी टीका
- ‘भारत जागतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देऊ शकतो’, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचे मत
- कोरोना आटोक्यात कसा येणार? देशातील निम्मे लोक मास्कच वापरत नाहीत
- पंतप्रधान मोदींकडून हिवरेबाजारच्या कोरोना प्रतिबंधक कामांची दखल
- पुण्याला दिलासा ; आज नव्या कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या आत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
