Share

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेवर लवकरच येणार चित्रपट?

Published On: 

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका तब्बल दहा वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. आता लवकरच या मालिकेवर आधारित चित्रपट येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत आसित मोदी यांनी स्वत: यावर वक्तव्य केल आहे.

सध्या आसित मोदी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. आशातच आता या मालिकेच्या चाहत्याच्या ट्विटवर त्यांनी उत्तर दिले आहे.  एका चाहत्याने आसित यांना विनंती केली आहे की ‘तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेवर एखादा चित्रपट तयार करा. ही मालिका जगातील सर्वात चांगल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेवर चित्रपट करा. आम्ही हा चित्रपट हिट करून टाकू’, असे या चाहत्याने  म्हंटले आणि यावर नी या चाहत्याला उत्तर दिले आहे.

आसित मोदींनी चाहत्याचे ट्वीट रिट्वीट करत  ‘हो’ असे उत्तर दिले आहे. त्यांच्या या उत्तरामुळे अनेकांनी  आनंद व्यक्त केला आहे. या मालिकेतील सर्वच पात्र लोकप्रिय आहेत. यातील प्रत्येक व्यक्तीने अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

ही मालिका ‘फक्त मराठी’ या वाहिनीवर ‘गोकुळधामची दुनियादारी’ या नावाने प्रदर्शित झाली आहे. तसेच हि मालिका कार्टूनमध्ये देखील पाहायला मिळते. लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या या मालिकेवर लवकरच चित्रपट पाहण्यासाठी चाहते देखील आतुर झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!