कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मूक आंदोलनाला आजपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त खासदार संभाजीराजे यांनी समाजाला शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर करोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करुन हे आंदोलन करण्यात यावं असंही त्यांनी समाजाला सांगितलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली आजपासून कोल्हापुरातून मूक आंदोलनाला सुरुवात होत आहे. त्या निमित्ताने ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल, ‘संभाजीराजेंनी आंदोलन करण्याआधी मुख्यमंत्र्यांशी एकदा चर्चा करायला हवी होती. मात्र आंदोलन करणं प्रत्येकाचा अधिकार आहे. ते जरुर करावं फक्त कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेऊन करावं’ असं आवाहन केले होते.
याला आज उत्तर देताना संभाजीराजे म्हणाले, ‘अजितदादांचा मला फोन आला होता. मी त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला भेटून समाजाच्या मागण्या तुमच्या पुढे ठेवलेल्या आहेत. त्यावर तुम्ही चर्चा करावी. आणि जेव्हा तुम्ही, मुख्यमंत्री, अशोक चव्हाण सगळे एकत्र असाल तेव्हा मला बोलवा. मी येईन.
मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा
मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन आहे. हा मूक मोर्चा आहे. आज लोकप्रतिनिधी बोलतील, मराठा समाज दु:खी आहे. समाजाला न्याय मिळावा अशी सरकारला विनंती आहे. आमचा लोकप्रतिनिधींवर विश्वास आहे, मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली.
कोल्हापूर शहरात मोठा बंदोबस्त
मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात होणाऱ्या आंदोलनाला राज्यभरातून समन्वयक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनाला येणाऱ्या प्रत्येक समन्वयकाची नोंद कोल्हापूर पोलिसांनी ठेवली आहे. कोरोना संकटाचे सर्व नियम पाळून आंदोलन व्हावं, असं आवाहन देखील कोल्हापूर पोलीस दलाकडून करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलोय – चंद्रकांत पाटील
- मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन – संभाजीराजे
- ‘नियम पाळा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन’, जिल्हाधिकारी जगताप यांची तंबी
- ‘डब्ल्युटीसी अंतिम एकादशमध्ये ‘या’ दोन्ही खेळाडुंचा समावेश व्हावा’, लक्ष्मणने व्यक्त केली इच्छा
- डब्ल्युटीसी अंतिम सामन्यात कोहलीकडे ‘हा’ विश्वविक्रम नोंदवण्याची संधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
