Share

‘रावसाहेब दानवे हे आमचे चांगले मित्र, त्यांच्या विनोदी शैलीचे कौतुकच’, राऊतांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसापासून शिवसेना नेते संजय राऊत सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. परंतु त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, अशी टीका केंद्रिय राज्यमंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केली होती. ‘संजय राऊत यांना चावी दिली की ते बोलतात पण आता लोक संजय राऊतांना गांभीर्याने घेत नाहीत’, असा टोलाही त्यांनी काल मंगळवारी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना लगावला होता.

यावर आज संजय राऊत यांनी दानवेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ‘दोन वर्षापूर्वी आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचे कुलूप उघडलं आणि शिवसेनेला सत्ता मिळाली, तसेच भाजपच्या सत्तेला टाळं लागलं असे म्हणत पलटवार केला. याचबरोबर ‘रावसाहेब दानवे हे आमचे चांगले मित्र आहेत, कधी कधी ते विनोद करतात. त्या विनोदी शैलीचे मी कौतुक करतो’, असे म्हणत राऊतांनी राजकारणातील खिलाडू वृत्तीचे दर्शन दाखवले.

नाना पटोले यांना मुख्यमंत्री होण्यासाठी…
दरम्यान महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्मूल्याची चर्चा सुरू झाली. यावर मंगळवारी बोलताना रावसाहेब दानवे यांनी नाना पटोले आणि अजित पवार यांना चिमटा काढला. नाना पटोले यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचं आहे. अनेक वेळा त्यांनी हे माझ्याकडे बोलून दाखवलं आहे.

त्यांना त्यासाठी शुभेच्छा आहेत. मात्र त्यासाठी त्यांच्याकडे फक्त तीन वर्षाचा काळ आहे. या तीन वर्षात त्यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं. त्यानंतर त्यांना संधी मिळणार नाही. कारण २०२४ नंतर भाजपची स्वबळावर सत्ता येईल असा दावा रावसाहेब दानवे यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!