Share

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विनापरवानगी सत्कार सोहळा, मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

Published On: 

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक येथील सातपूर कॉलनीत ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. विनापरवानगी घेतलेल्या या कार्यक्रमामुळे सातपूर पोलीस ठाण्यात मनसेच्या सहा पदाधिकाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सातपूर येथे मनसे सैनिकांनी ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. मनपाच्या समाजमंदिरात हा कार्यक्रम पार पडला. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई केली आहे.

मात्र, तरीही सत्काराचा कार्यक्रम घेतल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश ऊर्फ बंटी दत्तात्रय लभडे, शहर सचिव अंबादास आहिरे, शहर उपाध्यक्ष विजय आहिरे, शहर सरचिटणीस मिलिंद कांबळे, महिला विभाग अध्यक्षा आरती खिराडकर यांच्या विरोधात कलम २६९,२७०,१८८,३४ सह म.पो.का १३५ व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन २००५ चे कलम ५१ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शिवसेनेच्या दहा जणांवर कारवाई
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे विभागप्रमुख सुयश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी त्यांच्यासह नीलेश साळुंखे, निखिल मेंदळे, एकनाथ शिंदे आदी १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवचंद केदारे यांच्यासह अर्जुन वेताळ, ललित वाघ, नितीन माळी, संदेश जगताप इत्यादी पंधरा जणांनी आरोग्य शिबिर आयोजित केले होते. यासाठी परवानगी न घेतल्याने त्यांच्यावर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन  कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!