कोल्हापूर : आजपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरातून मूक आंदोलनाची सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांची नेतृत्त्वात आज हे आंदोलन पार पडणार आहे. या आंदोलनात प्रकाश आंबेडकर, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटीलही सहभागी झाले आहेत. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी उपस्थित राहिले आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मराठा मोर्चात सहभागी झाल्यानंतर ‘नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलो आहे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्यांना माझा आणि भाजपचा पाठिंबा असेल, येत्या अधिवेशनात सरकारने मराठा आरक्षणाबद्दल मूलभूत मागण्या मान्य कराव्या, असे देखील चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले आहेत.
तर, मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन आहे. हा मूक मोर्चा आहे. आज लोकप्रतिनिधी बोलतील, मराठा समाज दु:खी आहे. समाजाला न्याय मिळावा अशी सरकारला विनंती आहे. आमचा लोकप्रतिनिधींवर विश्वास आहे, मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली.
मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात होणाऱ्या आंदोलनाला राज्यभरातून समन्वयक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनाला येणाऱ्या प्रत्येक समन्वयकाची नोंद कोल्हापूर पोलिसांनी ठेवली आहे. कोरोना संकटाचे सर्व नियम पाळून आंदोलन व्हावं, असं आवाहन देखील कोल्हापूर पोलीस दलाकडून करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा समाजाला दिशा देण्यासाठी आजचं आंदोलन – संभाजीराजे
- ‘नियम पाळा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन’, जिल्हाधिकारी जगताप यांची तंबी
- ‘डब्ल्युटीसी अंतिम एकादशमध्ये ‘या’ दोन्ही खेळाडुंचा समावेश व्हावा’, लक्ष्मणने व्यक्त केली इच्छा
- डब्ल्युटीसी अंतिम सामन्यात कोहलीकडे ‘हा’ विश्वविक्रम नोंदवण्याची संधी
- महिला क्रिकेट संघाचा इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना आजपासुन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
