Share

कोविशिल्ड-कोव्हॅक्सिन लसीचा संमिश्र डोस मिळणार?

Published On: 

नवी दिल्ली: ७ ऑगस्टरोजीच आरोग्य मंत्रालयाकडून जॉन्सन या कंपनीच्या कोरोना लसिला परवानगी देण्यात आली. आता अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीचे संमिश्र डोस दिल्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने याबाबतची माहिती दिली आहे. या दोन्ही लसींची समिश्र डोस सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढल्याचंही निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कोविशिल्ड-कोव्हॅक्सिन लसीचा संमिश्र डोस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वेल्लोरमधील ख्रिश्चियन मेडिकल कॉलेजला कोविड-१९ च्या मिश्र चाचणीची परवानगी मिळाली होती. केंद्रीय औषध नियमक मंडळाच्या एका समितीने ही शिफारस केली होती. त्यानंतर याच्या चाचणीला सुरुवात झाली होती.

त्यामुळे कोरोनाविरोधाच्या लढ्यात अजून एक लसीला लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान देशभरात आतापर्यंत ११ करोड नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर राज्यात ४ करोड नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे कोविशिल्ड-कोव्हॅक्सिनच्या संमिश्र लसीला परवानगी भेटल्यास लसीकरणास अधिक वाव मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!