सांगोला: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगोला येथे गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. तब्बल ५० वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे 30 जुलैरोजी निधन झाले. यावेळी शरद पवार उपस्थित राहू शकले नव्हते , त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची भेट आज शरद पवार घेणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा त्यांनी विजय विक्रम गणपतराव देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या निधनाने राजकारणातून अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला होता. दरम्यान आता शरद पवार त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
दरम्यान शरद पवार यांच्या पुलोद सरकारच्या काळात गणपतराव देशमुख यांनी मंत्रिपदही भूषविलेले आहे. अत्यंत साधी राहणीमान अशी त्यांची ओळख होती. सध्या शरद पवार सांगोला दौऱ्यावर असून ते लवकरच गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदींना भाजप विचारसरणीचे न्यायाधीश पाहिजे’, पी.चिदंबरम यांची टीका
- आज होणार अजित पवार यांची बैठक, पुण्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता
- आयपीएल स्पर्धेत बीसीसीआयने बायोबबलचे नियम केले कठोर, उल्लंघन झाल्यास कुटुंबावरही होणार कारवाई
- पहिली कसोटी निर्णायक टप्प्यात, विजयासाठी भारताला हव्या १५७ धावा
- पुणे शहरात आज नव्याने २०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
