Share

पहिली कसोटी निर्णायक टप्प्यात, विजयासाठी भारताला हव्या १५७ धावा

Published On: 

मुंबई : भारत-इंग्लंड पहिली कसोटी निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव ३०३ धावांवर अटोपला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने दुसऱ्या डावात १ गडी गमावून ५२ धावा केल्या होत्या. अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज आहे.

भारत-इंग्लंड पहिली कसोटी ही संपुर्णपणे वेगवान गोलदांजाच्या नावे राहिली. सामन्यातील आतापर्यंत वेगवान गोलंदाजानी ३० गडी बाद केले आहेत. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावात ३०३ धावांची मजल मारत भारतीय संघासमोर २०९ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १ गडी गमावुन ५२ धावांची मजल मारली आहे.

दुसऱ्या डावात इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने कॅप्टन इंनिंग्स खेळताना १७२ चेंडुत १४ चौकारासंह १०९ धावांची शतकी खेळी केली. तर भारतीय संघाकडून या डावात पुन्हा एकदा बुमराहने सर्वाधीक ५ गडी बाद केले. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद करत त्याला पुरेपुर साथ दिली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा दोघे प्रत्येकी १२ धावांवर खेळत होते. पहिल्या डावातील अर्धशतकवीर के एल राहुल या डावात २६ धावांवर बाद झाला. त्याने ६ चौकारासह ही खेळी साकारली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!