Share

आयपीएल स्पर्धेत बीसीसीआयने बायोबबलचे नियम केले कठोर, उल्लंघन झाल्यास कुटुंबावरही होणार कारवाई

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केल्यामुळे बीसीसीआयने स्पर्धा स्थगीत केली. काही दिवसातच बीसीसीआयने स्पर्धेच्या उर्वरीत सामन्याचे आयोजन युएईमध्ये करण्याची घोषणा केली. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ही स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे.

आयपीएल २०२१ च्या पहिल्या सत्रात झालेल्या कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे यंदाच्या हंगामात बीसीसीआयने बायोबबलचे नियम अधीक कठोर केले आहे. यंदाच्या सत्रात बायोबबलचे नियम हे संघातील सदस्य आणि त्यांच्या कुटुंबालादेखील लागु होणार आहे. सहभागी खेळाडूंनी किंवा त्यांच्या कुटुंबीयानी बायोबबलच्या नियमाचे उल्लघंन केले तर त्यांच्यावर अनुशासनात्मक कारवाई केली जाणार आहे. टीमच्या सर्व सदस्याना विमान प्रवासाच्या ७२ तास आधी कोरोना चाचणी करावी लागणार आहे. यानंतर त्यांना कोणाच्याही संपर्कात येत येणार नाही.

महत्वाची बाब म्हणजे आयपीएलमध्ये सहभागी होण्यापुर्वी सर्व खेळाडूंना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांग्लादेश आणि न्युझीलंडचे खेळाडू सहभागी होणार आहे. येत्या १९ सप्टेंबर रोजी पहिला सामना तर १५ ऑक्टोबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!