Share

राखी सावंतच्या आयुष्यवर जावेद अख्तर लिहिणार स्क्रिप्ट ; लवकरच येणार बायोपिक

Published On: 

मुंबई : आपल्या अजब-गजब वक्तव्यामुळे चर्चेत असलेली बॉलिवूडमधील कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखी सावंत ही पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात गेली होत. तिथे तिने खळबळजनक खुलासे केले होते.

आता राखी दुसऱ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. बीग बॉसच्या अंतिम फेरीतून बाहेर पडलेल्या अभिनेत्री राखी सावंतच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार करण्यात येणार आहे. तसा दावा राखी सावंतने केला आहे. या गोष्टीला लेखक जावेद अख्तर यांनीही पुष्टी दिलीय. त्यामुळे आता लवकरच राखी सावंतचे जीवन प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळणार आहे.

जावेद अख्तर यांनी स्पॉटबॉय ला दिलेल्या एका मुलाखतीत ही गोष्ट सत्य असल्याचं सांगितलंय. ते म्हणाले की, “राखी सावंत जो दावा करतेय तो सत्य आहे. चार-पाच वर्षापूर्वी आम्ही एका फ्लाइटमध्ये भेटलो होतो. त्यावेळी राखीने आपल्या लहानपणीच्या आठवणींबद्दल आपल्याला सांगितलं होतं.

त्यावेळी मी तिला सांगितलं होतं की मी एक दिवस तुझ्या आयुष्यावर आधारित स्क्रिप्ट लिहिणार आहे. आता राखी सावंतच्या जीवनावर आधारित बीओपीक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!