Share

जागतिक आरोग्य संघटना कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबतचा तपास पुन्हा सुरु करणार ?

Published On: 

🕒 1 min read

न्यूयॉर्क – कोरोना विषाणूमुळे जगभरात कोट्यावधी लोक बाधित झाले आहेत तर या विषाणूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठी आहे. परंतु या विषाणूची उत्पत्ती नेमकी कोठे झाले? तो कुठून आला आहे, हे गूढ काही उकललेले नाही. त्यामुळेच त्याच्या तपासात अद्याप काहीही स्पष्टपणे समोर आलेले नाही. म्हणूनच याबद्दलचा तपास पुन्हा केला पाहिजे अशी मागणी होत आहे.

दरम्यान, चिनी वैज्ञानिकांनी विषाणू तयार केल्यानंतर त्याला रिव्हर्स-इंजिनिअरिंग व्हर्जनमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून हा विषाणू वटवाघळापासून आल्याचा जगाचा समज होईल. मात्र, त्यांचे हे कारस्थान अपयशी ठरले आहे असा आरोप दोन संशोधकांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यानंतर आता कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबतचा आपला तपास पुन्हा सुरु करण्याचा विचार जागतिक आरोग्य संघटना करीत आहे.

याविषयीचा आपला अभ्यास, संशोधन आणि तपास पुन्हा नव्यानं सुरु ठेवण्यासाठी संघटनेनं विशेषज्ञांचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. चीनमधील वूहान इथल्या एका प्रयोगशाळेत या विषाणूची उत्पत्ती झाल्याचं म्हटलं जातं. नव्यानं याबाबतचे पुरावे शोधण्यासाठी 20 शास्त्रज्ञाचं एक पथक स्थापन करण्यात आलं आहे. या पथकात प्रयोगशाळा आणि जीव सुरक्षा विषयातील तज्ज्ञ तसच अनुवंशिकता शास्त्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!