मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीच्या वसुलीचे गंभीर आरोप केले होते. अंबानी स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी सचिन वाझे याचे नाव आल्यानंतर परमबीर सिंह यांची बदली करण्यात अली होती. यानंतर नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून हे गंभीर आरोप केले होते.
दरम्यान, या सर्व प्रकरणाची सध्या सीबीआय चौकशी सुरु असून अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयने देशमुखांच्या विविध मालमत्तांवर छापे टाकल्यानंतर आता या प्रकरणात आणखी एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.
परमबीर सिंह यांच्यावर हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. अकोल्याच्या पोलीस निरीक्षक पदावरील एका अधिकाऱ्याने याबाबतचे गंभीर आरोप केले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना याबाबत पत्र देखील लिहिले आहे. ‘परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली. परमबीर सिंग यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या व्यवसायात त्या पैशांची गुंतवणूक केली,’ असा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पैठण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात तातडीने डिसीएचसी सुविधा सुरु करा : मंत्री भूमरे
- महाराष्ट्रद्रोही टोळीतील प्रसाद लाड यांनी महाराष्ट्राची माफी मागावी; काँग्रेस नेत्याची मागणी
- गंगापूर तालुक्यात आरोग्य यंत्रणा तोकडी, बेडची संख्या वाढवा -स्वाभिमानी शेतकरी संघटना
- घर का भेदी..! युवतीने मित्राच्या मदतीने घरातून चोरले २० तोळे सोने
- लॉकडाऊनमुळे बळीराजा संकटात; बाजारपेठा बंद असल्याने कांद्याचे होतायत वांदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

