गंगापूर : शहरासह ग्रामीण भागात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर सुरु करण्यात यावे. रुग्णांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा देण्यात याव्या यासाठी सर्व स्तरातून मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांना गंगापूर तालुक्यातील सद्यपरिस्थितीत उपजिल्हा रुग्णालयात साधे बेड, तसेच ऑक्सिजन बेड वाढवण्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गंगापूर तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसोंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे रुग्णांसाठी बेडची संख्या कमी पडत असून सध्या स्थितीत ५० रुग्णांची व्यवस्था असलेल्या कोविड सेंटरमध्ये ५८ रुग्णांना भरती करण्यात आले आहे. अशा परिस्थितीमध्ये दररोज रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. आणि रुग्णासाठी गंगापूर येथे बेड शिल्लक नाही.
ही परिस्थिती चिंताजनक असून बेडची व्यवस्था होणे गरजेचे आहे. त्यामुळे गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील असलेले बेड यांनाच ऑक्सिजन व इतर व्यवस्था निर्माण केल्यास कमी वेळामध्ये जास्तीची साधनसामुग्री न वापरता बेडची संख्या वाढवली जाऊ शकते. बेडची संख्या वाढवणे याविषयी आपल्या स्तरावरून निर्णय घ्यावा. तसेच कोरोना सेंटर मध्ये ज्यावेळेस गंभीर रुग्ण येतात त्यांना बेड पर्यंत घेऊन जाण्यासाठी वाॅर्ड बॉयची व्यवस्था असणे आवश्यक आहे.
परंतु याठिकाणी वॉर्डबॉय वेळेवर उपलब्ध राहत नसल्याने कोरोना सेंटरमध्ये बेडपर्यंत घेऊन जाण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना स्वतः घेऊन जावे लागत आहे. हि यंत्रणा सज्ज ठेवून बेडची संख्या तत्काळ वाढविण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तसेच राजमुद्रा जनविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संपत पाटील रोडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिक्षकांना विमा कवच द्या, अन्यथा कोरोना, लसीकरण कामांवर बहिष्कार!
- ‘मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात’
- राज्यात कोरोनाची दुसरी लाट अभूतपूर्व, मात्र आता लॉकडाऊनचे… : अमित देशमुख
- कांगावेखोरांनी संकटसमयी लोकांना रोज सकाळी भ्रमित करू नये, फडणवीसांचा टोला
- परभणी जिल्ह्यात ११ आरोग्य अधिकाऱ्यांचे पदे रिक्त, आरोग्य यंत्रणेवर पडतोय ताण


