मुंबई : राज्यासह देशभरात कोरोनाचा हाहाकार पुन्हा एकदा वाढला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून राज्य सरकारने स्वतः ऑक्सिजन निर्मितीची वाढ करण्यासह केंद्राकडे मदत मागितली आहे. केंद्र सरकारने राज्यासाठी मोठी मदत उपलब्ध करून दिली आहे.
अशातच, ‘महाराष्ट्रात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम केअर फंडातून निधी देण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने या निधीचा विनियोगच केला नाही. केंद्राने दिलेला निधी आणि मुख्यमंत्री निधीतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे केले असते तर राज्यात ऑक्सिजन अभावी अनेकांचा बळी गेला नसता,’ असा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.
आता प्रसाद लाड यांच्या आरोपांना काँग्रेसने देखील चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘महाराष्ट्रात 10 ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार होते, पण अद्याप केंद्र सरकारने एकाही प्लांटच्या उभारणीचे काम सुरु करणे दूरच, साधी टेंडर प्रक्रियाही राबवलेली नाही. हे सत्य माहित असूनही केंद्र सरकारच्या गलथानपणावर पांघरून घालून महाराष्ट्राची बदनामी करण्याची मोहिम भाजप नेते राबवत आहेत. आमदार प्रसाद लाड हे या महाराष्ट्रद्रोही टोळीचा भाग आहेत. खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल केल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे,’ अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात कोरोनाची दुसरी लाट अभूतपूर्व, मात्र आता लॉकडाऊनचे… : अमित देशमुख
- ‘वसुलीखोर अनिल देशमुखांनंतर आता वसुलीकांडाचे सूत्रधार अनिल परब यांचेही कांड बाहेर येणार’
- कांगावेखोरांनी संकटसमयी लोकांना रोज सकाळी भ्रमित करू नये, फडणवीसांचा टोला
- आता घरातही मास्क घालण्याची वेळ आली, केंद्र सरकारची सूचना
- ‘मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

