Share

पडळकारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता दाखवणारे पोलीस प्रणिती शिंदेंवर कारवाई करणार का ?

Published On: 

सोलापूर – राज्यावर सध्या डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचे काळे ढग दाटू लागले आहेत. डेल्टा प्लसचे रुग्ण वाढू लागल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये तसेच डेल्टा प्लसपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या नव्या शासकीय नियमांमुळे सोलापूर शहरात देखील सायंकाळी पाच नंतर संचारबंदी आहे. मात्र, काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महापालिकेच्या नगरसेविका अनुराधा काटकर यांच्या प्रभागात जाहीर रात्री कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या बहुतांश नागरिकांच्या तोंडावर मास्क नव्हता. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करण्यात आल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, नुकताच कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आमदार आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर पोलिस गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवतील काय, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे राज्य सरकारने दुपारी चारनंतर राज्यांमध्ये निर्बंध कडक केले आहेत. या कालावधीत जमावबंदीचा नियम मोडल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पडळकर आणि २९ समर्थकांवर सोलापुरमध्ये जोडभावी पेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय दंड संहिता कलम 1860/188/269 आणि 336 तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 ब नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता पडळकर यांना वेगळे नियम आणि शिंदे यांच्यासाठी सोलापुरात वेगळे नियम आहेत का असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!