Share

IND vs WI : वेस्ट इंडिजचा भारताकडून व्हाईट वॉश

Published On: 

मुंबई: अहमदाबादमध्ये झालेल्या तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने विंडिजला ९६ धावांनी पराभूत केले आहे. तसेच मालिका ३-० ने जिकंत व्हाईट वॉशही केला आहे. रोहित शर्माचे पूर्णवेळ कर्णधार म्हणून हा पहिला मालिका विजय ठरला आहे. तसेच भारताने सलग १५व्या वर्षी विंडीजला परास्त केले आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर (८०) आणि ऋषभ पंत (५६) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 265 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना विंडीज संघ १६९ धावांवरच गार झाला. मोहम्मद सिराज आणि प्रसीध कृष्णा या दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या तर दीपक चहर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

वेस्ट इंडिजसोबत मालिका जिंकत भारतीय संघाने २०१७ नंतर एकदिवसीय मालिकेत पहिला व्हाईटवॉश केला आहे. त्यांनी आधी पाच सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप केले होते. नव कर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय मालिका व्हाईटवॉश करत जिंकून संघाचे नेतृत्व करणारा आठवा भारतीय कर्णधार ठरला आहे. अशी कामगिरी करणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत रोहित शर्मा सोबत , कपिल देव, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन, एमएस धोनी, गौतम गंभीर, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!