Share

राहुल गांधी आणि नवज्योतसिंह सिद्धू यांची प्यारवाली झप्पी देणार का पंजाब राजकारणाला नवीन वळण?

Published On: 

🕒 1 min read

पंजाब: येत्या रविवारी (२० फेब्रुवारी) रोजी पंजाबमध्ये निवडणुक पार पडणार आहे. (Punjab Assembly Election 2022) त्यापूर्वीच कॉंग्रेस, भाजप तसेच आपने प्रचारसभा करत आपआपली तयरी सुरु केली आहे. विविध घोषणा, प्रचारसभा यामुळे पंजाबमधल राजकारण चांगलेच जोर धरू लागले आहे. तत्पूर्वी कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही पंजाबमध्ये प्रचारसभेला हजेरी लावली.

यादरम्यान कॉंग्रेसने “प्यार, मोहब्बत और भाईचारा याही संदेश है हमारा”, हा नारा दिला. यावेळी राहुल गांधी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी आणि नवज्योतसिंह सिद्धू यांची गळाभेट करत निवडणुकीपूर्वी शुभेच्छा दिल्या. याचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. यावरूनच राहुल गांधी आणि नवज्योतसिंह सिद्धू यांची प्यारवाली झप्पी पंजाब राजकारणाला नवीन वळण देणार का? अशा चर्चा रंगत आहेत.

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील जनतेनेही काँग्रेसच्या ‘पार्टनर इन क्राइम’ पक्षापासून सावध राहिले पाहिजे. या पक्षाचे नेते अमली पदार्थमुक्त पंजाबच्या गप्पा मारतात, पण त्यांनी दिल्लीत दारूचे ठेके उघडले असल्याचा आरोप केला आहे. तसेच पंजाबमधील क्वचितच असे कोणतेही गाव असेल जिथे आपले यूपी-बिहार बंधू-भगिनी कष्ट करायला येत नाहीत. पण काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी कोणते अपमानास्पद विधान केले आणि त्यांचे कसे कौतुक झाले, हे साऱ्या देशाने पाहिले. असा टोलाही मोदींनी लगावला आहे.

शेती हे समृद्धीचे साधन असू शकते हे पंजाबने देशाला दाखवून दिले होते. मात्र काँग्रेसच्या धोरणांमुळे येथील जमिनीची सुपीकता कमी होत आहे, जमिनीतील रसायने वाढली आहेत. त्यामुळे पंजाबच्या शेतकऱ्यांना आज नवीन विचार आणि नवी दृष्टी असलेल्या सरकारची गरज आहे. असेही मोदींनी म्हटले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच पंजाबचे राजकारण चांगलेच तापले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!