बीड: राज्यभरात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बीड जिल्ह्यात देखील शिवजयंतीचा उत्सव पाहायला मिळतोय. शिवजयंतीनिमित्त गेवराई शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचं १५ हजार स्क्वेअर फिट मध्ये पोर्ट्रेट साकारण्यात आलं आहे. गड किल्ल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टोन हे पोर्ट्रेट साकारण्यात आले आहे.
या पोट्रेटची निर्मिती करण्यासाठी जवळपास एक आठवड्याचा कालावधी लागलाय. दीडशे बाय शंभर फूट जागेत १७ ब्रास बेसॉल्ट स्टोन, २५० किलो चुना आणि १६० किलो काळा कलर वापरून शिवरायांचं पोर्ट्रेट साकारण्यात आले आहे. सलग दोन वर्ष कोविडमुळे शिवजयंतीवर निर्बंध होते. परंतु यंदा निर्बंध शिथिल झाल्याने शिवजयंतीचा उत्सव पाहायला मिळतोय.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: मेगा ऑक्शननंतर अवघ्या आठवड्यात सनरायझर्स हैद्राबादच्या कोचने दिला राजीनामा
‘नारायण राणेंनाही कुणी तरी ‘बॉय’ असेलच…’; गुलाबराव पाटलांचा टोला
“भाजपातील नेत्यांना भूताटकीने झपाटले आहे”, संजय राऊतांचा खोचक टोला
“किरीट सोमय्यांना स्वप्नातही बंगले दिसतात”, संजय राऊतांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

