🕒 1 min read
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी देशात कोरोना संक्रमणाला कॉंग्रेस आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला होता. यावरून राज्यात संतापाची लाट उसळली होती. मात्र आता पुन्हा एकदा कॉंग्रेसने हा मुद्दा लावून धरला आहे. आता शिवजयंतीला मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.
नाना पटोले काल (१७ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, “पंतप्रधान मोदी व भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी, यासाठी काँग्रेसच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून मुंबई व इतर काही जिल्ह्यांत आंदोलन करण्यात येत आहे. मात्र त्याचबरोबर या आंदोलनाचाच पुढचा टप्पा म्हणजे मोदी यांनी माफी मागावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पत्रे पाठविण्यात येतील.”
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र दिल्लीचे तख्त आणि अहंकारी इंग्रजांसमोर कधीही झुकला नाही. त्यामुळे दिल्लीच्या सत्तेसमोर गुडघे टेकून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळू नका, राज्यातील जनता कधीही माफ करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त माफी मागून तुमच्या पापाचे प्रायश्चित करा, अशा आशयाचे पत्र देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात येणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “किरीट सोमय्या देशातील सर्वांत मोठा चोर, लफंगा, आणि डाकू”, संजय राऊत संतापले
- छत्रपती शिवाजी महाराजांचे १५ हजार स्केअर फूट मध्ये पोर्ट्रेट
- “अलिबागचे जावई आहात जावयासारखे या; अन्यथा…,” महेंद्र दळवींचा सोमय्यांना इशारा
- IPL 2022: मेगा ऑक्शननंतर अवघ्या आठवड्यात सनरायझर्स हैद्राबादच्या कोचने दिला राजीनामा
- ‘नारायण राणेंनाही कुणी तरी ‘बॉय’ असेलच…’; गुलाबराव पाटलांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
