मुंबई: पाकिस्तानचा माजी स्टार खेळाडू शाहिद आफ्रिदी याने सगळ्या फॉरमॅटचे क्रिकेट सोडल्यानंतर आता पाकिस्तान सुपर लीगमधूनही बाहेर पडायचा निर्णय घेतला आहे. आफ्रिदीने फेअरवेल व्हिडिओ पोस्ट करत याबदल माहिती दिली आहे.
शाहीद आफ्रिदीने त्याच्या युट्यूब हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तो म्हणाला ” माझे शरीर पूर्ण दुखत आहे. यामुळे मी पीएसएल स्पर्धा पुढे खेळू शकत नाही. मी चाहत्यांचे आभार मनू इच्छचितो , त्यांनी मला खूप पाठींबा दिला आहे. मी त्यांचासाठीच शेवटचा पीएसएल सीजन खेळणार होतो. मात्र माझ्या दुखापतीमुळे मी तो पूर्ण करू शकलो नाही, त्यामुळे मी त्यांची माफी मागतो.”
शाहिद आफ्रिदीने पीएसएलला गुड बाय म्हटले आहे. पाकिस्तान सुपर लीगच्या पहिल्या सत्रात, शाहिद आफ्रिदी कर्णधार आणि आयकॉन प्लेयर म्हणून पेशावर झल्मी फ्रँचायझीचा भाग होता. पीएसएल २०१७ मध्ये आफ्रिदीने पेशावर झल्मीचा कर्णधारपद सोडले. त्यानंतर आफ्रिदी कराची किंग्ज संघाचा भाग बनला. पीएसएल २०१९ ड्राफ्टच्या आधी शाहिद आफ्रिदीने कराची किंग्ज संघ सोडला आणि मुलतान सुलतानमध्ये खेळाडू म्हणून सामील झाला. दोन वर्षे मुलतान सुल्तान मध्ये काढल्यानंतर २०२२ मध्ये तो क्वाटा ग्लॅडिएटर्सचा भाग होता. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “किरीट सोमय्या देशातील सर्वांत मोठा चोर, लफंगा, आणि डाकू”, संजय राऊत संतापले
- छत्रपती शिवाजी महाराजांचे १५ हजार स्केअर फूट मध्ये पोर्ट्रेट
- “अलिबागचे जावई आहात जावयासारखे या; अन्यथा…,” महेंद्र दळवींचा सोमय्यांना इशारा
- IPL 2022: मेगा ऑक्शननंतर अवघ्या आठवड्यात सनरायझर्स हैद्राबादच्या कोचने दिला राजीनामा
- ‘नारायण राणेंनाही कुणी तरी ‘बॉय’ असेलच…’; गुलाबराव पाटलांचा टोला


