Share

अर्णब गोस्वामींच्या अडचणी वाढणार ? आता काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार !

Published On: 

मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर आता देशाच्या सुरक्षेसंबंधी गुप्त माहिती पसरवली असल्याचा आरोप होत आहे. गोस्वामी यांच्या विरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील असलेली ही माहिती अर्णब गोस्वामी यांना कशी मिळाली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काँग्रेसनं हाच मुद्दा उचलून धरत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली येथील समता नगर पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या कलम ५ अन्वये कारवाई करून अर्णब यांना अटक करा आणि त्यांची चौकशी करा, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

टीआरपी घोटाळ्यात ‘बार्क’चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक करून त्यांची कसून चौकशी केली आहे. चौकशी दरम्यान दासगुप्ता यांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. अर्णब गोस्वामी हे मुख्य आरोपी असल्याचंही पोलिसांना सांगितलं आहे. ‘गोस्वामी यांनी आपल्याला १२ हजार डॉलर्सचे हॉलिडे पॅकेज व एकूण ४० लाख रुपये दिल्याची कबुलीही दासगुप्ता यानं दिली आहे’.

दरम्यान, अर्णब गोस्वामी व दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सऍप संभाषण पोलिसांना मिळाल्याने खळबळ माजली आहे. त्यात भारतीय हवाई दलानं पाकिस्तानातील बालाकोट तळावर केलेल्या हल्ल्याच्या संदर्भातील संवाद आहे. गोस्वामी यांना या कारवाईची आधीच माहिती होती, असं त्यातून स्पष्ट झाल आहे. बालाकोट एअर स्ट्राइकची माहिती अर्णब गोस्वामी यांना कुणी दिली हे समोर आलं पाहिजे. ही माहिती त्यांनी पुढं कोणा-कोणाला दिली? त्यांचे पाकिस्तानातील कोणाशी संबंध आहेत का?,’ याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!