Share

पुणे पालिकेनी धाडली संजय काकडे आणि निलेश राणेंना नोटीस; थकवली तब्बल ८३ लाखांची पाणीपट्टी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आल्याने महापालिकेने आता उत्पन्नवाढीवर लक्ष केंद्रित केले आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १७० कोटी रुपयांची थकित व्यावसायिक पाणीपट्टी पालिकेच्या रडारवर आली असून, या थकबाकीच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

पुण्याबाहेरील व पुण्यातील माजी खासदारासह बडे बांधकाम व्यावसायिक, बहुतांश सरकारी कार्यालये, शिक्षणसंस्था तसेच विविध व्यावसायिकांनी महापालिकेचे सुमारे २०० कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविली असून, महापालिका प्रशासनाने या थकबाकीदारांची नावे वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहेत. महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा या थकबाकीदारांमध्ये विशेष सहभाग असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पाणीपट्टी थकवणाऱ्यांच्या यादीत भाजपचे नेते निलेश राणे आणि संजय काकडे या भाजपच्या माजी खासदारांसह अनेक नामांकित आणि त्यांच्याशी संबंधित संस्था इमारती यांचा समावेश आहे. भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्या मालकीच्या कंपन्यांचे थकबाकी सुमारे 66 लाख रुपये इतकी आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते व माजी खासदार निलेश नारायण राणे यांची थकबाकीची रक्कम सुमारे 17 लाख रुपये इतकी असल्याचे स्पष्ट करण्यात आहे.

दरम्यान महापालिकेने चालू केलेल्या या मोहिमेत सर्वप्रथम १० लाख रुपयांहून अधिक थकबाकीदारांकडे महापालिकेने आपला मोर्चा वळविला आहे. या थकबाकीदारांची यादी पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या थकबाकीदारांनी २५ जूनपर्यंत थकबाकीची रक्कम जमा न केल्यास त्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता त्यांचे नळजोड बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची तंबी महापालिकेने दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!