मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता काल दिली असून आता ४ ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचे पालन करुन शाळा सुरु होणार आहेत. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
मात्र मुंबईतील शाळा नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांना माहिती दिली आहे. ‘सोमवार – मंगळवारपर्यंत या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. ग्रामीण भागात पाचवी पासून वर्ग सुरू होत आहेत. पण शहरी भागात आठवीपासून शाळा सुरू होत आहेत. मुंबई मनपाच्या शाळा आठवी ते दहावी पर्यंतच्या सुरू करणार आहोत,’ असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांना उपस्थितीची सक्ती नाही – शिक्षणमंत्री
‘४ ऑक्टोबरपासून शाळा सुरु होणार आहेत. पण शाळांमध्ये येण्यासाठी पालकांची संमती असणं आवश्यक असणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना अटेडन्सची कोणतीही सक्ती केली जाणार,’ असं गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कंपनीने असमर्थता दर्शविल्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली – टोपे
- बहुजन समाजातील मुलांनी यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे – पडळकर
- ‘खुद तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे’; सनरायझर्स हैदराबाद समोर टिकणार का पंजाब किंग्स?
- अमेरिका दौऱ्यावर असलेल्या नरेंद्र मोदींकडे राखी सावंतने केली अजब मागणी
- काँग्रेसला देशात पुन्हा एकदा सोनियाचे दिवस येतील – बाळासाहेब थोरात


