🕒 1 min read
मुंबई : राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. पण ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली. आज आणि उद्या होणारी परीक्षा ही रद्द झाल्याची माहिती शुक्रवारी रात्री नऊ वाजता राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे परीक्षांच्या आयोजनाच्या बाबत राज्य सरकारचा गोंधळ कायम असून त्यामुळे जवळपास आठ लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय.
परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे.आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झालेली नसून पुढे ढकलण्यात आलेली आहे. जाहीर केलेल्या जागा कोणत्याही परिस्थिती भरणारच आहे. कंपनीने असमर्थता दाखवल्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. पण विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. मी विद्यार्थ्यांची माफी मागतो. पण विद्यार्थ्यांनी काळजी करु नये. येत्या काहीच दिवसांत परीक्षेच्या तारखेची घोषणा केली जाईल, असं स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिलं.
राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. मात्र कंपनीच्या असमर्थततेमुळे परीक्षा रद्द केल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली. मात्र शासनाने रात्री उशिरा हा निर्णय घेतल्याने हजारो विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी कुणी प्रवास करत होतं. तर कुणी अगोदरच पोहोचलं होतं. मात्र शासनाने परीक्षेला जेमतेम 12 तास बाकी असताना हा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- गोरगरीब विद्यार्थ्याना वेठीस धरल जातंय; आरोग्य विभागातील परीक्षा रद्द झाल्यानंतर निलेश राणेंनी डागली तोफ
- बहुजन समाजातील मुलांनी यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे – पडळकर
- फलटण-सातारा-बेळगाव-बंगळुरू मार्गे महत्वाचा पुणे ते बंगळुरू हा नवा हरित महामार्ग – गडकरी
- भारतीय हवाई दलाची ताकत वाढणार, 56 विमानांच्या खरेदी करण्याकरिता स्पेनच्या कंपनीसोबत करार
- मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकाकडून हार्दिक पंड्याच्या पुनरागमनाबद्दल मोठे अपडेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
