🕒 1 min read
पुणे – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे स्वप्नील लोणकरचा जीव गमवावा लागला होता. त्यांनतरही या प्रस्थापितांच्या सरकारनं ना नियुक्त्या दिल्या ना पदभरत्या केल्या असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच रिक्त पदे जास्त असूनही ठाकरे सरकारने लोकसेवा आयोगाकडे पदभरतीसाठी कमी जागांची मागणी केली असल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे.
पडळकर म्हणाले, आतातर यांनी वेगवेगळ्या वीस विभागातील ११,३५१ पद रिक्त असताना मात्र लोकसेवा आयोगाकडं फक्त आणि फक्त ४,२६४ रिक्त पदांच्या पदभरतीची मागनी केली. यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे कोविडच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागात सर्वच श्रेणीतील पद २५०० च्या आसपास पद रिक्त असताना अमित देशमुखांच्या खात्यानं लोकसेवी आयोगाला काहीच मागनी केली नाही.. हीच बोंब अनके खात्यांची आहे.
प्रशासन व सरकार यांच्यात कसलाही ताळमेळ नाही. हे काय फक्त एकमेकांसोबत टक्केवारीच्या फुगड्या खेळतायेता का? स्वताची मुलं, नातू, आमदार खासदार होण्यापुरतं फक्त प्रस्थापितांकडं रिक्तपदे असतात पण बहुजन समाजातील मुलांनी मात्र यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे अशी घणाघाती टीका पडळकर यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गोरगरीब विद्यार्थ्याना वेठीस धरल जातंय; आरोग्य विभागातील परीक्षा रद्द झाल्यानंतर निलेश राणेंनी डागली तोफ
- ब्रेकिंग : अखेर मंदिरांची दारे उघडणार; मुख्यमंत्री ठाकरेंनी केली तारखेची घोषणा
- फलटण-सातारा-बेळगाव-बंगळुरू मार्गे महत्वाचा पुणे ते बंगळुरू हा नवा हरित महामार्ग – गडकरी
- भारतीय हवाई दलाची ताकत वाढणार, 56 विमानांच्या खरेदी करण्याकरिता स्पेनच्या कंपनीसोबत करार
- मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकाकडून हार्दिक पंड्याच्या पुनरागमनाबद्दल मोठे अपडेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
