मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या तीन दिवसांकरिता अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बॉलीवूडची अभिनेत्री राखी सावंतने नरेंद्र मोदींकडे अमेरिकेवरुन येताना आपल्यासाठी एक वस्तू घेऊन येण्याची मागणी केली आहे. अनेकदा राखी चर्चेत येण्यासाठी असे अनोखे वक्त्यव्य करत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. सध्या आता राखीने केलेल्या या अजब मागणीमुळे तिच्यावर अनेकजण टीका करत आहे.
राखी स्पॉट केले असता, यावेळी तिला काही फोटोग्राफर्सनं मोदीजी वॉशिंग्टनला असण्याबाबत प्रश्न विचारले. त्यावर राखी म्हणाली, मोदीजी आपल्या देशाच्या विकासासाठी अमेरिकेत गेले आहेत. अशावेळी मी त्यांना नमस्कार करते. आपण अमेरिकेत गेला आहात. तिथे असणाऱ्या आपल्या सर्व भारतीयांना आपण प्रेम द्या. त्यांना माझ्या खुशालीविषयीही सांगा.
एवढ्यावरच राखी थांबलेली नाही. यावेळी राखीनं मोदींना आपल्यासाठी शॉपिंग करण्यासाठी विनंती केली आहे. तुम्ही ज्यावेळी अमेरिकेतून भारतात याल तेव्हा माझ्यासाठी डॉलर्स घेऊन या. अशी मागणी तिनं केली आहे.
राखी नेहमी आपल्या वेगळेपणामुळे चर्चेत असते अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्त्याव्यामुळे ती अडचणीत येत. या वक्तव्यामुळे तिला अनेकदा ट्रोलही व्हावे लागले आहे. मात्र त्याचा राखीवर काही एक परिणाम होत नाही. ती आपल्या व्हिडिओमधून चाहत्यांचे मनोरंजन करते. यातच आता राखीने चक्क मोदींकडे अमेरिकेहून एक वस्तू आणण्याची मागणी केल्याने पुन्हा एकदा तिची चर्चा रंगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गोरगरीब विद्यार्थ्याना वेठीस धरल जातंय; आरोग्य विभागातील परीक्षा रद्द झाल्यानंतर निलेश राणेंनी डागली तोफ
- बहुजन समाजातील मुलांनी यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे – पडळकर
- फलटण-सातारा-बेळगाव-बंगळुरू मार्गे महत्वाचा पुणे ते बंगळुरू हा नवा हरित महामार्ग – गडकरी
- भारतीय हवाई दलाची ताकत वाढणार, 56 विमानांच्या खरेदी करण्याकरिता स्पेनच्या कंपनीसोबत करार
- मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकाकडून हार्दिक पंड्याच्या पुनरागमनाबद्दल मोठे अपडेट


