Share

संजय राठोड यांचे अच्छे दिन येणार? बंजारा समाजाचे धर्मगुरू मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Published On: 

मुंबई : परळीतील पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शिवसेनेच्या संजय राठोड यांनी वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, ते प्रकरण शांत झाल्यावर त्यांच्या मंत्रिमंडळवापसीची चर्चा सुरू झाली होती. परंतू त्यानंतर एकापाठोपाठ होत असलेल्या आरोपांमुळे त्यांना मिळणारे मंत्रिपद धुसर झाले. पण आता पुन्हा एकदा राठोड यांच्या मंत्रिपदाच्या आशा पल्लवित झाल्यात. कारण, बंजारा समाजातले धर्मगुरू आणि पोहरादेवीचे मुख्य पिठाधीश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनूसार, बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि पोहरादेवीचे मुख्य पिठाधीश बाबूसिंग महाराज सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेत. राठोड यांच्यावर एक झाले की एक आरोप होत असताना बाबूसिंग महाराज सह्याद्रीवर आल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेटण्यासाठी बाबूसिंग महाराज गेल्याची माहिती पोहरादेवी संस्थानच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान गेल्याच आठवड्यात संजय राठोड यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. ते वनमंत्री असताना शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप या महिलेने केला असून आपली तक्रार यवतमाळ पोलिसांकडे पोस्टाद्वारे केली होती. पोस्टाने तक्रार करून काही कारवाई झाली नसल्याने त्या महिलेने काही वेळापूर्वी थेट पोलीस ठाणे गाठले.

यावर राठोड यांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला होता. ‘अत्यंत खालच्या थराला जाऊन सध्या राजकारण केले जात आहे. मी आणि माझे कुटुंबीय मागील प्रकरणात कोणत्या मानसिकतेतून गेलो असेल याची कल्पना करावी आणि अशा आरोपाने माझे राजकारण संपणार नाही, असे सांगत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर यावे, अशी माझी स्वत:ची इच्छा आहे’ असे ते म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!