मुंबई : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने पुण्यातील वानवडी परिसरातील एका इमारतीवरून उडी मारत जीवन संपवले होते. यानंतर या आत्महत्या प्रकरणामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील महिलावर्ग नाराज झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते.
पुढे काही फोटो व कथित ऑडिओ रेकॉर्ड्स समोर आले होते. यातील काही क्लिप्समध्ये पूजाशी संजय राठोड यांचे संभाषण झाल्याचा आरोप भाजपने केला होता. संजय राठोड यांच्या विरोधात भाजपने आक्रमक पवित्र घेत त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेऊन रितसर चौकशी करावी अशी मागणी केली होती. वाढत्या तणावानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्या वनमंत्रिपदाचा राजीनामा घेतला होता. मात्र आता पुन्हा हेच संजय राठोड हे मंत्रिमंडळात असायला हवे असे सेनेच्या मंत्र्यांना वाटू लागले आहे.
‘संजय राठोड यांच्या कामाची पद्धत पाहता त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, लवकरच ते मंत्रिमंडळात सामील होतील,’ असं सूचक विधान सेनेचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत केलं आहे. उदय सामंत शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले आहे. दरम्यान, आता भाजपने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप महिला मोर्च्याच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांनी मुंबईत बोलताना सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
खापरे म्हणाल्या की, राज्यामध्ये एकिकडे महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ होत असताना तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणी राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आक्रमक भूमिका घेईल.संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे प्रयत्न चालू असून तसे झाल्यास महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालतील असा इशारा यावेळी खापरे यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- करन्सी नोट प्रेसमधील 5 लाख चोरी प्रकरण, नाशिक पोलिसांच्या तपासाला सुरवात
- लडाख कचरा प्रकरणावर आमिरच्या टीमने सोडलं मौन, म्हणाले….
- ‘संजय राऊत यांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं आणि तेच अग्रलेखात लिहिलं’
- झोटिंग समितीचा गायब अहवाल सापडला, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार?
- आर्यलँडचा दक्षिण आफ्रिकेवर ४३ धावांनी धक्कादायक विजय


