मुंबई : मराठी चित्रपट नेहमीच वेगळेपणासाठी आणि वास्तवतेचे दर्शन घडवण्यासाठी ओळखले जातात. याच गुणधर्मामुळे मराठी चित्रपट केवळ भारतातच नव्हे तर जगभरात कौतुकास पात्र ठरतात. अशाच एका चित्रपटाने तब्बल ५४ पुरस्कार पटकावत मराठीचा झेंडा पुन्हा एकदा अटकेपार लावला आहे.
‘फिरस्त्या’ असे या चित्रपटाचे नाव आहे. निरक्षर आणि अर्थिक परिस्थीती हलाखीची असलेल्या एका मुलाच्या अनुभवाची कथा या चित्रपटात मांडले आहे. प्रतिकुल परिस्थीतीत संघर्ष करत यशापर्यंत पोहचण्याची धडपड करणाऱ्या खेडेगावातील होतकरु तरुण विशिष्ट लक्ष्य कसा गाठतो. यादरम्यान त्याची भटकंती आणि भेटीतील वेगवेगळी गावं, शहरे अशी या चित्रपटाची कथा आहे. पुणे आयकर विभागात सह आयुक्त म्हणून कार्यरत असलेले विठ्ठल मंच्छिंद्र भोसले यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
‘फिरस्त्या’ने प्रदर्शनापुर्वीच भारत, रशिया, फ्रान्स, इंग्लंड यासारख्या ११ देशात विविध चित्रपट महोत्सवात कौतुक मिळवले. या महोत्सवात ‘फिरस्त्या’ने एकुण ५४ पुरस्कार पटकावले आहे. यातील १८ पुरस्कार हे सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी मिळाले आहेत. तर दिग्दर्शक विठ्ठल मच्छिंद्र भोसले यांनीही दिग्दर्शनासाठी १७ पुरस्कार पटकावले आहे. यात समीर परांजपे, हरिष बारस्कर, अंजली जोगळेकर, समर्थ जाधव या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- सावळ्या रंगामुळे सोनालीला देखील करावा लागला वर्णभेदाचा सामना; अनुभव शेअर करत म्हणाली …
- नितेश राणेंनी एकत्र येण्याचे वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेने दिली प्रतिक्रिया
- वेब सिरीजनंतर क्रीडाविश्वात ‘समांतर’ची पुनरावृत्ती! सचिन-मेसीची सारखीच कहाणी
- ‘शाळा अद्याप सुरू करू नयेत, कारण…’ ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भूमिका
- महाराष्ट्रात आज कोरोनाचे ८ हजार ५३५ नवे रुग्ण तर ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

