Share

‘सत्ता येणार… सत्ता येणार असे बोलून भाजपचे नेते जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत’

Published On: 

मुंबई – भाजपचे लोक तारीख पे तारीख देत आहेत. सत्ता येणार…सत्ता येणार… ही भाजपची एकही भविष्यवाणी सत्य होत नाहीय त्यामुळेच ते हताश होवून आघाडी सरकार विरोधात एककलमी कार्यक्रम राबवत असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

इतर पक्षातून आलेले आमदार स्वगृही परत जावू नये म्हणून भीतीने राज्यात लवकरच सत्ता येणार असे सांगत आहेत. परंतु तिन्ही पक्ष एकजुटीने काम करत आहे असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

कोरोना, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस या अडचणी आलेल्या असतानाही या सर्व परिस्थितीला मात देवून राज्यातील जनतेला मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली त्यामुळे जनता संतुष्ट आहे असेही नवाब मलिक म्हणाले. मात्र सत्ता येणार… सत्ता येणार असे बोलून राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत. त्यांचा हाच एककलमी कार्यक्रम असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!