Share

राज्यपाल कोट्यातील आमदारांच्या यादीबाबत अद्याप राज्य सरकारच ठाम नाही ? भाजपचा दावा

Published On: 

मुंबई : काही महिन्यांपूर्वी राज्यात विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नेमणूकीवरून मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. आता हाच मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयापर्यंत देखील पोहोचले आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले होते.

दरम्यान, या नियुक्तीसंदर्भात सोमेश कोलगे या पत्रकाराने केलेल्या माहिती अधिकार कायद्यांतर्गत मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेले उत्तर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी समोर आणत महाविकास आघाडी सरकार व खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीतील नेते राज्यपाल कोट्यातील आमदारकीवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण करत असतानाच १२ सदस्यांचा नावाचा प्रस्ताव अद्याप राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचं उत्तर मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहे.

यामुळे केशव उपाध्ये यांनी, ‘पूर्वी ठरलेली नाव बदलण्याचा प्रस्ताव आहे का? तिन्ही पक्षांचा कोटा बदलतोय का? मुख्यमंत्री मंत्रालयातच जात नसल्याने विचार पूर्ण झाला नाही का ?’ अशा प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

केशव उपाध्ये यांचं ट्विट –

‘त्या १२ आमदारांचा प्रस्ताव विचाराधीन मुख्यमंत्री कार्यालयाचे माहिती कायदा अतंर्गत उत्तर. प्रश्न होता- प्रस्ताव कधी पाठवला? कोणती नावे पाठविली? काही उत्तर आले का? यावर, हा प्रस्तावच विचाराधीन असल्याचे सांगितले आहे मात्र आता संजय राऊत नेमकी भुताटकी कुठे झाली आहे? कारण हा प्रस्तावच अजून विचाराधीन आहे.’ असा हल्लाबोल केशव उपाध्ये यांनी केला असून आता महाविकास आघाडी काय उत्तर देणार हे महत्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!