Share

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला परवानगी मिळणार?; दिलीप वळसे-पाटील म्हणाले…

Published On: 

मुंबई: राज ठाकरे हे आयोध्य दौऱ्यापूर्वी पुण्यात सभा घेणार आहेत अशी माहिती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. ही परवानगी मिळाल्यानंतर राज ठाकरे यांच्या सभेची तारीख निश्चित होईल. माहितीनुसार, २१ मे किंवा २९ मे रोजी राज ठाकरे यांची सभा होण्याची शक्यता आहे. पण या सभेला पोलीस परवानगी देतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला परवानगी देणार का, असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर गृहमंत्र्यांनी आपले म्हणणे मांडले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारण्याचे कारण दिसत नाही. पोलीस आयुक्त या सभेला परवानगी देतील. मात्र, मनसेने पोलीस आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे वळसे-पाटील म्हणाले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी सोमवारी पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या राड्यासंदर्भातही भाष्य केले. “यासंदर्भात पोलीस योग्य ती कारवाई करतील. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चूक केली असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. भाजपच्या कार्यकर्त्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई होतील. भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करणे ही आक्षेपार्ह बाब आहे. यासंदर्भात पुणे पोलीस योग्य ती कारवाई करतील”, असे दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!