मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध बुधवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे आयपीएल २०२२ मधून बाहेर पडला. रहाणेच्या हाताला दुखापत झाली आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या मागील सामन्यात रहाणेला दुखापत झाली होती. सामन्यादरम्यान तो खूप अडचणीत दिसला. या कारणामुळे फिजिओलाही मैदानात यावे लागले. त्यावेळी त्याची दुखापत खोलवर असल्याचे दिसत होते. यानंतर तो क्षेत्ररक्षणादरम्यान मैदानावर आला नाही. यानंतर, त्याचे स्कॅनिंग करण्यात आले, रहाणेला काही आठवडे विश्रांती घ्यावी लागणार आहे.
???? ???????????????????????????????? ????????????????????????????????????????????????
Ajinkya Rahane is going to miss the remaining games of #IPL2022 due to a hamstring injury.
Wish you a speedy recovery, @ajinkyarahane88. The Knights camp will miss you ????#AmiKKR #IPL2022 pic.twitter.com/aHDYmkE2f0
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 17, 2022
संघ सोडण्यापूर्वी रहाणे म्हणाला, ”मी केकेआरसोबत खूप चांगला वेळ घालवला आहे. क्रिकेटर असल्याने खेळ आणि जीवनाबद्दल खूप काही शिकायला मिळाले. सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाचे आभार. आशा आहे की आमचा संघ केकेआर प्लेऑफमध्ये पोहोचेल.”
या मोसमात रहाणेची बॅट शांत राहिली. त्याला ७ सामने खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याने १९च्या सरासरीने १३३ धावा केल्या. त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

