Share

सत्तारांना मातोश्रीची पायरी चढू देणार नाही, खैरे सत्तारांवर भडकले

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सुद्धा महाविकास आघाडीच्या हाती गेली आहे. येथे शनिवारी समोर आलेल्या निकालांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला अध्यक्षपद तर भाजपच्या उमेदवाराला उपाध्यक्ष पद मिळाले आहे. काँग्रेसकडून अध्यक्ष पदासाठी मीना शेळके यांनी तर शिवनेसेच्या वतीने उपाध्यक्ष पदासाठी शुभांगी काजवे यांची उमेदवारी दाखल करण्यात आली होती. परंतु काजवे यांना उपाध्यक्ष पद मिळवता आले नाही.

अध्यक्षपदासाठी मीना शेळके आणि शिवसेनेच्या बंडखोर आणि भाजप पुरस्कृत दिवयानी डोणगावकर यांना 30-30 अशी समान मतं मिळाली. पण चिठ्ठी काढून काँग्रेसच्या मीना शेळके विजयी झाल्या. तर उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या गायकवाड यांना 32 तर महाविकास आघाडीच्या शुभांजी काजे यांना 28 मतं मिळाली आहेत. कोल्हापूर, नाशिकनंतर आता औरंगाबाद जिल्हा परिषद महाआघाडीने ताब्यात घेतली आहे.

शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारलं होतं. राज्यमंत्रीपद दिल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात होते. सोबत औरंगाबाद जिल्हा परिषद शिवसेनेकडे असावी, असंही त्यांचं म्हणणं होतं. मात्र, याठिकाणी काँग्रेचा उमेदवार दिल्याने नाराजी व्यक्त करत त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, हे नाराजी नाट्य संपलं असून अब्दुल सत्तार नाराज नसल्याचं माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितलं.

मात्र आता शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद शिवसेनेला न मिळाल्यामुळे खैरेंनी अब्दुल सत्तार यांच्यावर तोफ डागली आहे. मराठवाड्यात शिवसेना आमच्यामुळे वाढली आहे. सत्तार हे गद्दार आहेत. त्यांना मातोश्रीची पायरी चढू देणार नाही. तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!