औरंगाबाद : सरकारने १५ एप्रिल ते २५ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन करावे जेणे करुन नागरिकांचे त्याला समर्थन मिळेल आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गरजेचा असल्याचे पत्र माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विनंती देखील केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये खैरे म्हणाले की, सध्या महाराष्ट्राचे लक्ष लॉकडाऊन कधी लागणार ते कसे असणार याकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत. कहर खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच मृत्यूचा दर देखील खुपच मोठ्या गतीने वाढत आहे. यातच सर्व औरंगाबादकर लॉकडाऊन बाबत खुपच धास्तावले आहेत. दरम्यान शहरासह जिल्हातील व्यापाऱ्यांची खैरे यांची भेट घेऊन लॉकडाऊन बाबत सुचना करुन मत देखील मांडले आहे. या मतानुसार व्यापारी म्हणाले की, १३ एप्रिल तसेच १४ एप्रिल सार्वजनिक सुट्टी आहे.
बँका, सरकारी कार्यालये बंद असणार आहेत. त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प पडतील म्हणून मंगळवारी तसेच बुधवारी लॉकडाऊन करण्यात येवू नये असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. जर १५ ते २५ एप्रिलपर्यंत जर लॉकडाऊन लावले गेले तर सर्वसमान्य नागरिक तसेच व्यापाऱ्यांचाही समर्थन मिळणार असल्याचे या वेळी सांगितले. काही अत्यावश्यक सुविधा – सेवा पुरवणाऱ्या व्यापारी, संस्थांना, दुकानांना जर सुट दिली तर ते याचा गैरफायदा घेतात. छुप्या मार्गाने व्यवसाय सुरुच ठेवतात. ही खरी वस्तुस्थिती आहे. वाढता कोरोना जर आटोक्यात आणावयास असल्यास अशी ठोस पाऊले उचलावी लागतील याच मुळीच शंका वाटत नसल्याचे मत खैरे यांनी मुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिले आहे.
त्यामुळे व्यापारी तसेच नागरिकांच्या वतीने कुठलीही कोणालाही किंचीतशीही सुट देऊ नये. १५ ते २५ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन निर्णय घ्यावा. जेणेकरुन सर्व स्तरावर त्याचे स्वागत देखील होणार असल्याचे या निवेदनामध्ये लिहीले आहे. या पत्राची प्रत खैरे यांनी प्रधान सचिव आपत्ती, व्यवस्थापन, विभागीय आयुक्त औरंगाबाद सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, पोलिस आयुक्त निखील गुप्ता, मनपा आयुक्त तसेच प्रशासक अस्तीककुमार पांडेय यांना देखील दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जे ऍक्टर होऊ इच्छितात त्यांनी ‘हे’ शिकावं’
- संसर्ग वाढतोय आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – बाळासाहेब थोरात
- ‘ब्रेक द चैन’मुळे प्राजक्ता उदास, लिहिली ‘ही’ पोस्ट
- कामगारांची कोरोना तपासणी न केल्याने मेडिकल व्यावसायिकांना दंड
- शरद पवार यांच्या पित्ताशयावर यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया ;तब्येत स्थिर – नवाब मलिक

