Share

सिटीस्कॅन केंद्रानी स्थानिक प्रशासनाला माहिती देणे बंधनकारक : जिल्हाधिकारी

Published On: 

औरंगाबाद : डॉक्टरांनी रेफर केलेल्या सिटीस्कॅन रूग्णांची माहिती विहित नमुन्यात सिटीस्कॅन केंद्रानी स्थानिक प्रशासनाला देणे बंधकारक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत दिले आहेत. जिल्ह्यातील सिटीस्कॅन केंद्र समूह संसर्गाचे प्रमुख ठिकाण बनले आहेत. अनावश्यक सिटीस्कॅन थांबवण्याच्या सूचना केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या पाहणी दौऱ्यानंतर दिल्या आहेत.

त्या पार्श्वभूमीवर सर्व संबधितांनी खबरदारी घेत आरटीपीसीआर चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या तसेच उपचार घेत असलेल्या संबंधीत डॉक्टरांनी रेफर केलेल्या तसेच आवश्यकता असलेल्या कोरोना बाधितांचेच सिटीस्कॅन करावे. सिटीस्कॅन केलेल्या रूग्णांची माहिती विहित नमुन्यात सिटीस्कॅन केंद्रानी महानगरपालिकेस नियमितपणे सादर करावी, असे चव्हाण यांनी निर्देशित केले. शासनाच्या निर्देशानुसार रेमडिसीवीर इंजेक्शनचा वापर गरजेनुसार कोरोना उपचार नियमावली प्रमाणेच करणे बंधनकारक आहे. रुग्णांच्या उपचारामध्ये करण्यात आलेल्या इंजेक्शनच्या वापराबाबतची माहिती विहित नमुन्यात सादर करावी.

आवश्यकतेनुसार योग्य प्रमाणात योग्य वेळी ते रुग्णाला उपलब्ध करुन द्यावे. त्याचप्रमाणे शासन दरानुसार खाजगी रुग्णालयांनी कोरोना उपचार करणे बंधनकारक आहेत. अवाजवी दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे गंभीर स्थितीतील रुग्णाला दाखल करुन घेताना रूग्णाच्या तब्येतीला स्थिर करण्यास प्राधान्य देवून त्यानंतर रुग्णालयात दाखल करुन घेण्याच्या आर्थिक बाबींची पूर्तता, किंवा परिस्थितीनुसार दूसरीकडे संदर्भित करण्याबाबतची प्रक्रीया करावी. खासगी रुग्णालय (डीसीएचसी) मधील कोरोना रुग्णांच्या मृत्यू बाबतची माहिती रुग्णालयांनी महानगरपालिकेस सादर करावी. अशा रुग्णालयातील मृत्यूंचे विश्लेषण यंत्रणेमार्फत केल्या जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सूचित केले.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!