Share

थरारक सामन्यात पंजाबच ठरला किंग; सॅमसनची झुंजार खेळी व्यर्थ

Published On: 

मुंबई : आयपीएलमधील सोमवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्स संघाचा आखेरच्या चेंडुवर चार धावांनी विजय मिळवला. पंजाबने दिलेल्या २२२ धावांच्या बलाढ्य धावसंख्येपुढे राजस्थान रॉयल्सने जोरदार लढत देत सामना खेचून आणला. मात्र आखेरच्या चेंडुवर विजयासाठी ६ धावांची गरज असताना कर्णधार सॅमसन झेलबाद झाला.

या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना या हंगामात प्रथमच २०० धावांचा टप्पा ओलांडला. पंजाबकडून कर्णधार के एल राहुल आणि दिपक हुडा यांनी धडाकेबाज फलंदाजी करत अर्धशतके झळकावली. राहुलपेक्षा दिपक हुडाने राजस्थानच्या गोलंदाजाची धुलाई केली. अवघ्या २८ चेंडूत दिपक हुडाने ४ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने ६४ धावांची वादळी खेळी साकारली. तर कर्णधार के एल राहुलने ५० चेंडुत ७ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ८० धावांची खेळी केली.

२२२ धावांचे लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानावर उतरलेल्या राजस्थान संघाची सुरुवात निराशाजणक राहिली. त्यांचा आघाडीचा धडाकेबाज फलंदाज बेन स्टोक्स हा भोपळाही न फोडता माघारी तंबुत परतला. यांनतर फलंदाजीसाठी आलेल्या संजु सॅमसनने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत यंदाच्या आयपीएलमधील आपले पहिले शतक झळकावले. संजुने यावेळी ६३ चेंडुत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ११९ धावा केल्या. मात्र इतर फलंदाजाची त्याला साथ मिळाली नाही. मात्र एकाकी लढत देऊन त्याने सामना खेचून आणला. पण आखेरच्या चेंडुवर ६ धावांची गरज असताना तो झेलबाद झाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!