Share

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयचे समन्स, १४ एप्रिलला होणार चौकशी

Published On: 

मुंबई : सीबीआयकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 14 एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांना सीबीआयनं समन्स पाठवलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर 14 एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांच्या स्वीय सहायकांची रविवारी चौकशी करण्यात आली होती.

या अगोदर मुंबई उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणी सीबीआय चौकशीची परवानगी दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडूनही देशमुख यांना दिलासा मिळाला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. त्यावेळी देशमुख यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते.

अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची प्राथमिक चौकशी व्हावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च नकार दिला. १५ दिवसांमध्ये सीबीआयने प्राथमिक अहवाल सादर करावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. आता या चौकशीतून काय समोर येतय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!