Share

‘मलिक आणि राऊत जनतेच्या प्रश्नांवर कधीतरी पत्रकार परिषद घेणार आहेत का?’

Published On: 

मुंबई : क्रुझ पार्टीवर  एनसीबीने छापा टाकला. या छाप्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अट केली होती. क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि त्याच्यासह इतर अनेक जणांना २ ऑक्टोबर अटक करण्यात आले. त्यानंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत खळबळ उडवून दिली होती. आर्यन खानला काल जामीन मंजूर झाला आहे. यावरुन आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत.

राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांच्या लाडक्या आर्यनला एकदाचा बेल मिळाला. त्यामुळे त्यांचा जीव भांड्यात पडला. आता तरी त्या अतीवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांकडे लक्ष घ्यायला वेळ मिळेल का? आरोग्य विभागाच्या परिक्षांच्या गोंधळांनी हताश विद्यार्थ्यांकडे पाहणार का?, असे अनेक प्रश्न उपस्थित करत उपाध्ये यांनी महाविकास आघाडीला टीकेचे लक्ष्य केले आहे.

वाढत्या अत्याचाराच्या घटनांंनी महिलांना असुरक्षित वाटते त्यांना दिलासा मिळणार का? नवाब मलिक आणि संजय राऊत जनतेच्या प्रश्नांवर कधी तरी पत्रकार परिषद घेणार का?, असाही सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!