🕒 1 min read
अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लड संघादरम्यान पाच टी-२० सामन्याची मालिका अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी या मैदानावर होत आहे. सद्यस्थितीत आतापर्यंत झालेल्या सामन्यात प्रेक्षकांना ५० टक्के क्षमतेने प्रवेश दिला जात आहे. मात्र कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव पाहता उर्वरित सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही.
सोमवारी संध्याकाळी बीसीसीआयने या संदर्भात टि्वट करुन एक पत्रक जाहीर केले आहे. चाहत्यांची आणि खेळाडूंची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. आमचे पहिले प्राधान्य हे सुरक्षिततेला आहे असे बीसीसीआयने सांगितले आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी शक्य त्या उपाययोजना करणा आवश्यक आहे.
????The BCCI in consultation with @GCAMotera has decided to conduct the final three T20Is against England at the Narendra Modi Stadium behind closed doors.
More details – https://t.co/pQqW52qaSE@JayShah | @Paytm #INDvENG pic.twitter.com/PaNT2OmFC6
— BCCI (@BCCI) March 15, 2021
मागील काही दिवसापासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतंच आहे. उर्वरीत सामन्याची ज्या प्रेक्षकांनी तिकीटे खरेदी केलेली आहेत त्या प्रेक्षकांचे पैसे लवकरच परत केले जातील. यासंदर्भात माहिती आम्ही लवकरच देऊ. असे बीसीसीआयने या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- जिल्ह्यात 51689 कोरोनामुक्त तर 5796 रुग्णांवर उपचार सुरू ; आज 1128 रुग्णांची भर
- पियूष गोयल साहेब तुम्ही महाराष्ट्राचे, मराठवाड्यावर अन्याय का? : खासदार इम्तियाज जलील
- दुचाकी चालकावर फांदी पडल्याने चालक जखमी
- म्हणून उद्योग बंद करण्याची गरज नाही – जिल्हाधिकारी चव्हाण
- जालना : लॉकडाऊनचा निर्णय गुरुवारी; हॉटेल्स, खाद्यपदार्थ पदार्थांची दुकाने बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
