Share

‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ईडीसमोर जाणार’ ; अनिल देशमुखांनी दिली माहिती

Published On: 

मुंबई : नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर जिल्ह्यातील काटोल तसेच मूळ गाव वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने रविवारी पुन्हा छापे मारले. रविवारी सकाळीच ईडीचे चार जणांचे एक पथक नागपुरात दाखल झाले. त्यांनी थेट देशमुख यांच्या काटोलसह वडविहिरा येथील निवासस्थानांवर छापे मारले.

काटोल तालुक्यातच वडविहिरा या गावी देशमुख यांचे वडिलोपार्जित निवासस्थान आहे. ईडीच्या कारवाईमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील घर आणि उरण परिसरातील जमीन अशी मिळून 4 कोटी 20 लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त केल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं. मात्र, या संपत्तीची बाजारभावाप्रमाणे आजची किंमत ही 300 कोटीच्या वर असल्याचं सांगितलं जातं.

त्यामुळे देशमुख यांची 4 नाही तर तब्बल 300 कोटी रुपयाची संपत्ती जप्त केल्याचं बोललं जात आहे. याबाबत स्वत: अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलंय. आपली 300 कोटी नाही तर फक्त 4 कोटीची संपत्ती ईडीने तात्तपुरती जप्त केल्याचं देशमुख म्हणाले. ईडीने माझ्या परिवाराची अंदाजे 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मुलगा सलील देशमुख याने 2006 मध्ये 2 कोटी 67 लाख रुपयाची जमीन खरेदी केली होती. ती जमीन ईडीने जप्त केली आहे.

पण काही वर्तमानपत्रात 2 कोटी 67 लाख रुपयांची जमीन 300 कोटीची दाखवून गैरसमज पसरवले जात आहे, असं देशमुख यांनी म्हटलंय. तर मला ईडीचे समन्स आले होते. त्याविरोधात मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा जो निकाल येईल त्यानंतर मी स्वत: ईडीसमोर माझा जबाब नोंदवायला जाणार आहे, असं देशमुख यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!