मुंबई : छोट्या पडद्यावर विनोदी कार्यक्रम म्हणलं की पहिले नाव ओठांवर येते ते कपिल शर्माचे. लाफ्टर चॅलेंज शो मधुन स्टॅडअप कॉमेडीअन म्हणून पुढे आलेल्या कपील शर्माने स्वत:चा शो सुरु करत टिव्ही क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले.
यादरम्यान कपिल शर्मा शो नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतो. गेल्या काही काळापासुन कोरोना संसर्गमुळे हा शो बंद पडला होता. मात्र आता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी हा शो पुन्हा एकदा परत येत आहे. नव्या सिझनची घोषणा नुकतीच कपिल शर्माने केली. इन्स्टाग्राम या सोशल मीडीयावर कपिलने या कार्यक्रमातील कलाकारासोबत एक फोटो शेअर करत ही माहिती दिली.
https://www.instagram.com/p/CRd7Ctij_R_/
या फोटोला कॅप्शन देताना ‘नवी सुरुवात, तेही जुन्या चेहऱ्यासोबत’ असे कॅप्शन दिले आहे. या फोटोत कपिल शर्मा, भारती सिंह, कीकू शारदा, कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर आणि सुदेश लहरी हे सगळे कलाकार दिसून येत आहेत. मात्र हा शो कधी सुरु होणार याबद्दल काहीच खुलासा करण्यात आलेला नाही. तसेच सुनील ग्रोव्हर या शोमध्ये दिसणार अशी अफवा होती. मात्र याबद्दल अद्यापही कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- कृषी उत्पन्न बाजार समितीनिहाय आठ दिवसात अहवाल द्या, राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे कडक निर्देश
- अनिल देशमुख यांच्या काटोलमधील घरांमधून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
- ईडीच्या रडारवर असलेले अनिल देशमुख अटकेच्या भीतीने ‘नॉट रिचेबल’
- नंदुरबार अपघात; पंतप्रधान मोदींकडून मराठीत ट्विट करत मदत जाहीर
- नंदुरबारमध्ये गाडी दरीत कोसळली; भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू, १५ जखमी


